WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Ration Card News या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार लगेच करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Ration Card News देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे देशभरातील राशन कार्ड धारकांना मोठा धक्का देणारी बातमी आहे नागरिकांचे आता मोफत राशन बंद होणार आहे ते का होणार आहे कशामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत

Free Ration Card News पूर्ण माहिती

देशभरातील नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती या मोफत अन्नधान्याचा लाभ घेऊन कितीतरी लोकांनी याच्यावर आपला उदरनिर्वाह केला आहे गरिबांसाठी मोफत आणि धान्य योजना ही एक प्रकारे त्यांना वरदान आहे कारण त्यांना या मार्फत थोडासा त्यांचा आर्थिक ताण कमी होतो आणि आपल्या पोटाची आग विझते परंतु आता हेच अन्नधान्य काही लोकांचं बंद होणार आहे याचीच विश्लेषित माहिती आपण घेणार आहोत

Free Ration Card News : जर तुम्ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) लाभार्थी असाल, तर हा महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी आहे. आयकर विभाग आता अन्न मंत्रालयासोबत माहिती शेअर करणार आहे, ज्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची यादीतून नोंद वगळली जाऊ शकते.

कोणाच रेशन कार्ड रद्द होऊ शकतो?
PMGKAY ही योजना गरिब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली होती, जे आयकर भरत नाहीत आणि ज्यांना सरकारकडून मोफत धान्याचा लाभ मिळतो. मात्र, आता आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या डेटानुसार अपात्र लोकांना या योजनेतून काढले जाणार आहे.

जर एखादा लाभार्थी आयकरदाता असेल आणि त्याचे उत्पन्न विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर त्याचे नाव या योजनेतून वगळले जाईल. प्राप्तिकर विभाग अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला (DFPD) आधार किंवा पॅन क्रमांकासह मूल्यांकन वर्षाची माहिती प्रदान करेल, ज्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाऊ शकते.

सरकारने योजनेसाठी किती निधी दिला आहे?
सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात PMGKAY साठी 2.03 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जी चालू आर्थिक वर्षातील 1.97 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ही योजना कोविड-19 महामारीमुळे झालेल्या आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि सरकारने या योजनेचा कालावधी 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षांसाठी वाढवला आहे.

नवीन पडताळणी प्रक्रिया कशी होणार?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका आदेशात सांगितले आहे की, आयकर विभागातील महासंचालक (प्रणाली) यांना ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या (DFPD) सहसचिवांना माहिती देण्याचा अधिकार असेल.

जर लाभार्थ्याचा आधार पॅनशी जोडलेला असेल, तर प्राप्तिकर विभाग त्याच्या उत्पन्नाची पडताळणी करून अन्न मंत्रालयाला माहिती देईल.
जर लाभार्थ्याने पॅनकार्ड दिले असेल आणि तो करदाता असेल, तर त्याचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
जर लाभार्थ्याचा आधार क्रमांक कोणत्याही पॅनशी जोडलेला नसेल, तर त्या व्यक्तीची स्वतंत्र तपासणी केली जाईल.
डेटा गोपनीयता आणि सुरक्षितता कशी राखली जाणार?
यासाठी, आयकर विभाग आणि अन्न मंत्रालय (DFPD) यांच्यात एक सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.

या करारामध्ये डेटा हस्तांतरणाची प्रक्रिया, गोपनीयता, डेटा संरक्षण आणि माहितीचा सुरक्षित उपयोग यांचा समावेश असेल.
योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना केल्या जातील.

तुम्हाला काय करावे लागेल?
जर तुम्ही मोफत रेशन घेत असाल आणि आयकर भरत असाल, तर तुमचं नाव यादीतून वगळले जाऊ शकते. यासाठी, तुमच्या आधार आणि पॅन लिंकिंगची खात्री करून घ्या आणि सरकारी सूचना नियमितपणे तपासा.

जर तुम्ही अद्याप आयकर भरत नसाल आणि PMGKAY अंतर्गत मोफत धान्य घेत असाल, तर तुमच्यासाठी ही योजना सुरू राहणार आहे. मात्र, भविष्यात सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.

आयकर विभाग आता अपात्र लाभार्थ्यांना यादीतून काढण्यासाठी अन्न मंत्रालयासोबत डेटा शेअर करणार आहे. मोफत रेशन मिळवणाऱ्या व्यक्तींची पॅन आणि आधारद्वारे पडताळणी केली जाणार आहे. जर तुम्ही करदाता असाल, तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीतून काढलं जाऊ शकतं. सरकारने 2025-26 साठी PMGKAY साठी 2.03 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आधार आणि पॅन लिंक करून तुमच्या पात्रतेची खात्री करा आणि सरकारी अद्यतनांवर लक्ष ठेवा

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याचीच माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment