SSC HSC IMP 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत या संदर्भात आता बोर्डाकडून कठोर पावलं उचलण्यात आलेले आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आह कारण परीक्षा केंद्रावर आता महत्त्वाचे कलम लावलेले आहे या कलमाचे महत्त्व काय आहे आणि यामुळे आपल्याला काय धोका होऊ शकतो फायदा होऊ शकतो पाहूयात
SSC HSC IMP 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत केवळ बारावीच्या परीक्षेसाठी फक्त पाच दिवस राहिल्या आहेत या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेले आहेत की परीक्षा केंद्रावर 144 कलम लावले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे कारण परीक्षा केंद्रावर जर काही गैरकर प्रकार कोणी केला आणि जर झाला तर त्याला थेट अटक होणार आहे त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रह निर्माण होण्याचे गरज नाहीये त्यांच्यासाठी खूपच चांगला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेमार्फत इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात परीक्षाचे संचालन योग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात ‘कॉपी मुक्त अभियान’ राबविण्यात येत असून, मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनाचे पालन करण्याचे आवाहन दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच, परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये ११६ परीक्षा केंद्र असून परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या ३४ हजार ६३५ आहे. तसेच इयत्ता दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये एकूण १५९ परीक्षा केंद्र असून परीक्षार्थी संख्या ४० हजार १९४ आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाची बैठे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
बैठे पथक येणार
बैठे पथक परीक्षा सुरु होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर उपस्थित राहील. परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
परीक्षा कॉपीमुक्त व शातंतापूर्ण वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. परीक्षेत गैरप्रकारांना वाव मिळाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन शैक्षणिक दर्जा खालाऊ शकतो. त्यामुळे भावी पिढी सक्षम होणार नाही आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी व टिकविण्यासाठी सदर परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, तणावमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी परीक्षा संबधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत
परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परीसरातील कॉम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास आधीपासुन परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उपलब्ध असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खातरजमा करावी.
कॉपी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांस भेट देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १६ परिरक्षक केंद्र आहेत. सर्व परिरक्षक केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कार्यन्वित आहे. तसेच परिरक्षक केंद्रावरून पेपर घेतल्याची वेळ व पेपर जमा करण्याची वेळ याबाबत सी.सी.टी.व्ही. द्वारे नजर ठेवण्याचे सूचित केले आहे.
परिरक्षक केंद्रावरून पेपर घेऊन जाणे आणि जमा करण्यासाठी ज्या संस्थेचे किंवा शाळेचे परीक्षा केंद्र आहे. त्या शाळेच्या संस्था प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रसंचालक यांच्या मार्फत नियुक्त असलेला रनर शिक्षक यांनी चारचाकी वाहनाचा वापर करण्यासाठी आदेशित केले आहे. कॉपीमुक्त मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आठ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती चिंतादायक बातमी आहे बोर्डाच्या सर्व परीक्षेच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा