Ladaki bahin apatra yadi 2025 आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आता अपात्र करण्यास लाडक्या बहिणींना सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार की नाही मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहेत
Ladaki bahin apatra yadi 2025 पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आता महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणींची अपात्र यादी जाहीर होत आहे त्याचे निकष हे तपासले जात आहेत त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी या अपात्र होत आहेत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करून लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत परंतु आता या लाडक्या बहिणींमध्ये अपात्र यादी जाहीर होत आहे यात बऱ्याच सरकारी वर्ग आहे त्याचप्रमाणे अनेक काही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देखील आहेत त्यानंतर चार चाकी वाहन त्यांच्याकडे आहे त्यांचा देखील नाव कट करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभाथ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या ‘बहिणीं’ची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील ७५ हजार १०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका ‘बहिणीं’च्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. या याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन पडताळणी करणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीत ५८ हजार ३५०, तर दुसऱ्या यादीत
१६ हजार ७५० अशी एकूण ७५ हजार १०० वाहनधारकांची यादी प्रशासनाला मिळाली आहे. या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना देऊन प्रत्यक्षात पडताळणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महिला बाल विकासाचे सचिव काय म्हणाले
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी (ता. ३) दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणीच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला. स्वतःहून महिलांनी लाभसोडावा, असे आवाहन शासनाने केले होते, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचलले आहे.
ती’ नावे केवळ लाभार्थी वाहनधारकांचीच
शासनाकडून पाठविण्यात आलेली यादी ही वर्गवारी करून पाठविण्यात आली आहे. केवळ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या नावे वाहन असलेली किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे वाहन असलेल्यांचीच ती यादी आहे. त्यामध्ये इतर वाहनधारकांची यादी नाही. त्यामुळे या यादीत फक्त योजनेच्या संबंधित महिलांचीच यादी जिल्हा प्रशासनाला मिळालेली आहे. परिणामी अंगणवाडी सेविकांना पडताळणी करणे सोपे होणार आहे
अंगणवाडी सेविकांना महत्त्वाचा आदेश
योजनेच्या संदर्भात पडताळणी होऊ शकते, याचा अंदाज प्रशासनाला होता. त्यामुळे प्रशासनाकडून अगोदरच तयारी करण्यात आली होती, तर अंगणवाडी सेविकांनीच बा अर्ज ऑनलाइन भरले असल्याने त्यांना परिसरातील महिलांची माहिती आहे. अंगणवाडी सेविकांची अगोदरच तशी तयारी झालेली आहे. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठविणार आहे.
योजनेसाठी आवश्यक निकष कोणते ?
- लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
- संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.
महिलांचे मत आणि संभाव्य परिणाम
महिला वर्गातून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शासनाच्या या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी अनेक महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “घरात चारचाकी वाहन असणे म्हणजे श्रीमंत असणे नव्हे. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लाडक्या बहिणी ह्या अपात्र होणार आहेत या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा