ladaki bahin yoajana update आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीकडून आता वसुली सुरू झाली आहे किती महिला आपल होणार कोणत्या महिलांकडून वसुली सुरु होणार याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
ladaki bahin yoajana update पूर्ण माहिती
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेली योजना लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती अगदी कमी वेळेत ही योजना भरपूर प्रसिद्धीच होत आली आणि याचा योजनेमध्ये काही नियम बदललेले आहेत यामुळे याचा लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि त्यांच्याकडून चहा पत्थर होणारे त्यांच्याकडून वसुली देखील दंडास सकट होणार आहेत याबाबत आता महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले बघुयात
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि त्यामुळेचं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी आता योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत.
महायुती सरकारची बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या पडताळणी पूर्वीच ४ हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने महिलांनी माघार घेतल्याचे समोर आले आहे
योजनेचा लाभ थांबवण्यासाठी देखील विंनती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या होत्या? ladaki bahin yoajana update
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनावेळी अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. बहिणींनी दोन वेळा किंवा तीन वेळा अर्ज दाखल केले होते. काही महिलांचे उत्पन्न जास्त झाले असेल. चार चाकी वाहनं असतील त्यांनी लाभ परत देण्यास सुरुवात केलेली आहे. डिसेंबरमध्ये रक्कम प्राप्त झालेली आहे, जानेवारीत देखील लाभ जमा होत आहे. सरकारी चलानच्या माध्यमातून ती प्रक्रिया करुन घेत आहोत.
लाडक्या बहिणींचे आभार मानेन की ज्यावेळी लक्षात आलं की आपल्याला दोन वेळा लाभ आलेला आहे, आपण या योजनेस पात्र नाही, त्यावेळेला स्वत: पुढं येऊन राज्य शासनाचा निधी पात्र असण्याच्या पलीकडील परत करण्याची भूमिका महाराष्ट्राच्या बहिणींनी घेतली आहे. बहिणी लाडक्या आहेत आणि प्रामाणिक आहेत हे पाहायला मिळालं, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
योजनेचे पैसे थांबवण्याची महिलांची विनंती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी आधीच राज्यातील ४ हजार महिलांनी आपला अर्ज मागे घेतले आहेत. पैसे परत करावे लागतील या भीतीनं लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेस पात्र नसणाऱ्या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, या भीतीनं महिलांनी अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचे सरसकट पैसे मिळत होते मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार का?
लाडकी बहीण योजनेस अपात्र असलेल्या महिलांकडून दंड वसूल करण्याच्या चर्चा काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. मात्र आता सरकारतर्फे यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही आणि तसा सरकारचा कोणताही विचार नाही, असे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले ladaki bahin yoajana update
गरीबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र हेही खरं आहे, या योजनेचे काही नियम आहेत. ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत, मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येवू नयेत, याच्यापुढे लोकांना सांगावं, जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत. त्यांनी जर तसं नाही केलं तर मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागू शकतात?
ज्या महिलांच्यां कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा असेल त्या या महिला या योजनेसाठी अपात्र असतील. नोकरदार महिला, आयकर भरतात, चारचाकी वाहन ज्यांच्या नावावर असेल त्या महिलांना योजनेचे रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत परत करावी लागेल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील रक्कम परत करावी लागू शकते.
वरील लेखनात आपण बघितलं की लाडक्या वहिनींकडून कोणत्या वसुली होणार आहे याची माहिती आपण घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स साठी 9322515123 या क्रमांकावर संपर्क करा.