लाडक्या बहिणींना डिसेंबर चा हप्ता उद्या मिळणार पात्रता यादी जाहीर
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिना पर्यंत 7500 रुपये लभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. यानंतर महिला डिसेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता या महिलांची प्रतीक्षा संपली आहे. कारण डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत एक महत्त्वाचे अपडेट आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी (कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न) लाडकी बहीण योजना आणली. अवघ्या अडीच-तीन महिन्यांतच राज्यातील पावणेतीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ७४ हजारांवर महिला आहेत. जुलैपासून लाभ देण्यास सुरवात झाली, पहिल्यांदा दीड हजार रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर दोन-दोन महिन्यांचे दोन हप्ते वितरित झाले आहे
दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले. त्यांना आता दरमहा २१०० रुपये दिले जाणार आहेत, पण त्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. तत्पूर्वी, अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील, असेही बोलले जात आहे. पण, त्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहेत
नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणेबारा लाख लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसांत लाभ मिळेल. मुतदवाढीनंतर १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास ६४ हजार अर्जांची तपासणी सुरु असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहेत
– प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
लाभार्थींची सद्य:स्थिती
एकूण अर्जदार महिला
११.७५ लाख
छाननीत अर्ज बाद
७,०००
तात्पुरते अपात्र
३,८००
पडताळणी राहिलेले अर्ज
४,०००
संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये?
दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (प्रत्येकी तीन हजार रुपये) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आह..
hii
Satish
मला लाडक्या बहीणी चा डिसेंबर 1500 भेटले नाहीत
Ho mala nahi bhetla