Kamva aani shika yojana आज आपण बनवत की राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मुलींना आता उच्च शिक्षणासाठी जवळपास महिन्याला दोन हजार रुपये मिळतील यासाठी त्यांना काय कागदपत्र लागतील नेमकी कोणती योजना आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत
Kamva aani shika yojana संपूर्ण माहिती
Kamva aani shika yojana मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या पैशामधून मुलींना दैनंदिन खर्चासह शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे.
राज्यात उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आता नवीन धोरण आखत आहे. आता विद्यार्थिनींना ‘कमवा आणि शिका’ योजनेमार्फत त्यांच्या अध्ययनाच्या काळातच मासिक 2000 रुपये कमावता येणार आहेत. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
काय आहे कमवा आणि शिका योजना?
कमवा आणि शिका योजना, ही एक शैक्षणिक योजना आहे. या योजनेत, विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते, तसेच त्यांना कामाचा अनुभव मिळविण्यासाठी काम करण्याची संधी देखील मिळते.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
आर्थिक सहाय्य: या योजनेत विद्यार्थिनींना शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
कामाचा अनुभव: विद्यार्थिनींना कामाचा अनुभव मिळविण्यासाठी विविध कामांमध्ये सहभागी केले जाते.
स्वावलंबन: विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. श्रमाची प्रतिष्ठा: या योजनेत, विद्यार्थिनींना श्रमाचे महत्त्व आणि प्रतिष्ठा समजावून सांगितली जाते. शिक्षण आणि अनुभव: शिक्षण घेत असतानाच विद्यार्थिनींना कामाचा अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळण्यास मदत होते.
योजनेची प्रमुख उद्दिष्टे
गरजू विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यास मदत करणे. विद्यार्थिनींनामध्ये स्वावलंबन आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढवणे. विद्यार्थिनींना शिक्षण आणि कामाचा अनुभव एकत्र मिळवून देणे. समाजाला कुशल आणि आत्मविश्वासू मानव संसाधन प्रदान करणे. राज्यात उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवणे.
योजनेचा फायदा काय?
विद्यार्थिनींना शिक्षण साहित्य खरेदीसाठी किंवा वरखर्चासाठी पैशांची पूर्तता होईल. विद्यार्थिनींना दैनंदिन खर्चासाठी किंवा शैक्षणिक साहित्यासाठी पैशांचा हातभार लागेल. प्रत्येक महिन्याला 2000 रुपये विद्यार्थिनींच्या खात्यात हस्तांतरण केले जातील. सुमारे ५ लाख विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे.
विद्यार्थिनींसाठी अतिरिक्त मदत
विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून मासिक 6000 रुपये देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याआधीच घेतला आहे. या सहा हजार रुपयांची मदत विद्यार्थिनींना घरभाडे भरणे किंवा जेवणखर्च भागवणे, यासाठी होऊ शकते.
ही योजना वर्षभर राबवण्यासाठी किमान १००० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. पण राज्याची विद्यमान आर्थिक स्थिती लक्षात घेता तो मंजूर होण्यास काही काळ जाऊ शकतो.
विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून दर महिना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. या पैशामुळे विद्यार्थिनींना राहण्याची सोय तसेच जेवणाची सोय करता येईल. त्यासोबतच त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे. त्यासाठीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कमवा आणि शिका योजना आणण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.
ही योजना कशी राबवायची?
याबाबत आराखडा तयार करणे सुरु आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालये त्यांच्याकडील विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच या विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवली जाईल. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थिनी काम करत आहेत, त्यांच्या खात्यात महिन्याला दोन हजार रुपये जमा होतील या योजनेचा लाभ पाच लाख विद्यार्थिनींना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दरमहा १०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असंही चंद्रकात पाटील यांनी सांगितला आहे.
अशाप्रकारे आपण बघितलं की मुलींना शिक्षणासाठी दोन हजार रुपये महिना ला कसे मिळतील यासाठी कोणती योजना आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा