11th addmission online आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशाची पहिली यादी कोणत्या तारखेला लागणार आहे नवीन सुधारित वेळापत्रक आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण अकरावीचे वेळापत्रक बदललेला आहे यानुसार आता सुधारित वेळापत्रक काय आहे आणि पहिली यादी कोणत्या तारखेला लागणार आहे याची माहिती आपण घेऊयात.
11th addmission online संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाच्या परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्वात मोठा कल म्हणजे तो पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी असतो यावर्षी राज्य शासनाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेला लवकर घेतल्या त्याचप्रमाणे निकाल देखील लवकर लावला आता निकाल लावल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली त्यानंतर लगेच सर्वर डाऊन झाला आणि परत तीन दिवस ही वेबसाईट बंद होती सव्वीस तारखेला परत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आता पहिली यादी कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे प्रतीक्षा आहे आता सध्या पार्ट वन आणि पाठव असे फॉर्म भरले जात आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे कॉलेज निवडण्यापासून पसंती क्रमांक टाकण्यापासून प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपण बघूयात की आता पहिली यादी कोणत्या तारखेला लागणार आहे याची संपूर्ण माहिती
11th addmission online महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) ११ वी प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, आता विद्यार्थ्यांना ११ वी साठीचे ऑनलाइन अर्ज शाळांमधूनच भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लेखात आपण 11 वी प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती आणि सुधारित वेळापत्रकानुसार पहिली यादी कधी जाहीर होणार? याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.
प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती
११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाइन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण) यांनी दिली आहे.
संकेतस्थळ आणि अर्ज भरण्याची सुरुवात: विद्यार्थ्यांना 26 मे 2025 पासून www.mahafyjcadmission.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
उपलब्ध जागा आणि महाविद्यालये: या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीकृत महाविद्यालयांची संख्या ९,३३८ असून ‘CAP’ अंतर्गत १८,७४,९३५ जागा उपलब्ध आहेत.
पसंतीक्रम: विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा लागणार असून अर्जात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार, आराखडा आणि गुणवत्ता गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शाळांची जबाबदारी:
इयत्ता १० वीचे वर्ग असलेल्या शाळांनी त्यांच्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संगणक लॅब, इंटरनेट आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.त्याचप्रमाणे, ११ वीचे वर्ग असलेल्या अनुदानित, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी ११ वी ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संगणक लॅब आणि इंटरनेट सुविधा पुरवावी.
शुल्क आकारणी नाही: या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
सुविधा आणि सुलभता: विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शाळा व्यवस्थापनांना त्यांच्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुवर्णसंधी
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोट्यातून मिळालेल्या प्रवेशाच्या रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावी. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती अनिवार्यपणे नोंदवणे आवश्यक आहे.
11th Admission 1st Merit List 2025 ज्यांना प्रथम फेरीत प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी असेल. 5 जून 2025 रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत तक्रार असल्यास ऑनलाइन तक्रार अर्ज 6 व 7 जून पर्यंत सादर करता येईल. 8 जून 2025 रोजी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
मार्गदर्शन व सहाय्यता: विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी, तसेच महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत व ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तांत्रिक अडचण किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहाय्यता क्रमांकः ८५३०९५५५६४ वर अथवा ई-मेल : support@mahafyjcadmissions.in वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://mahafyjcadmissions.in/
अशाप्रकारे आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या अकरावीची पहिली यादी कोणत्या तारखेला लागणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा व नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा