11th addmission 2nd list आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशाची दुसरी यादी कोणत्या तारखेला लागणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट आलेले आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत अकरावी प्रवेश प्रक्रिया चालू आहे यामध्ये पहिली यादी झाली आहे का दुसरी यादी कधी लागणार या विषयी माहिती घेऊ
11th addmission 2nd list संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमचं जर मुलगा अकरावीला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत यामध्ये दुसरी यादी कोणत्या तारखेला लागणार आणि कोणत्या दिवशी त्याचप्रमाणे कोणत्या वेळेत लागणारी याविषयी मोठी अपडेट आलेले आहेत चे वेळापत्रक बघुयात
11th addmission 2nd list राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार विद्यार्थ्यांमधून केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश केव्हा मिळणार आणि त्यांचे वर्ग केव्हा सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र. शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 10 जुलैपासून 13 जुलै पर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.
शिक्षण विभागातर्फे यंदा प्रथमच राज्यातील सर्व जिल्ह्यांत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. प्रवेशासाठी 21 लाख 31 हजार 720 जागा असून त्यातील केवळ 5 लाख 8 हजार 96 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.अकरावी प्रवेशासाठी 9 हजार 466 महाविद्यालयांमधील जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीअंतर्गत अॅलॉट झालेल्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कॅप राऊंड मधून केवळ 4 लाख 32 हजार 284 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या राज्यातील 15 लाख 15 हजार 628 जागा अजूनही रिक्त आहेत.
शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 10 ते 13 जुलै या कालावधीत प्रवेशच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कट ऑफ नुसार गुणवत्ता यादी 17जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थी 18 ते 21 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतात. तर 23जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठी प्रवेशाच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.
अशाप्रकारे बघितलं की आपण राज्यातील अकरावीची दुसरी यादी कोणत्या तारखेला लागणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा