10th12th board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत या संदर्भात बोर्डाने एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीत एक महत्त्वाचे निर्णय काय घेतलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
10th12th board exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यावर्षी राज्य सरकारतील एसएससी महामंडळ राज्यात परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी करत आहेत यावर्षी प्रत्येक केंद्रवर ही सीसीटीव्ही बंधनकारक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सेंटरवर हे बैठक पथक भरारी पथक यांचा भर असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी अभ्यासाची जास्त गरज आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ( SSC and HSC exams ) होणार आहेत. या कालावधीत कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी प्रशासन सज्ज असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
बोर्डाच्या बैठकीत काय झाले
यासंदर्भात झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख,उपविभागी अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होते.
इयत्ता १० वीची परीक्षा दि.२१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान असून इयत्ता १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी तर इयत्ता १० वी ची परीक्षा ६८ हजार २२३ विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी एकूण ३९९ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत की, कॉपीमुक्त अभियानासंदर्भात,अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची परीक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी करावी.परीक्षा केंद्र सर्व भौतिकसुविधा युक्त असावे,परीक्षा केंद्र जवळील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद असतील, पोलीस बंदोबस्त तपासणीसाठी असेल.
बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ज्या शाळेंवर काही गैरप्रकार झाला आता त्या शाळेचे केंद्रच नाही तर त्या शाळेची देखील मान्यता आम्ही रद्द करणार आहोत त्यामुळे प्रत्येक शाळेला त्यांनी अलर्ट केले आहे यावर्षीच्या परीक्षा या सरासरी भरपूर सरसकट अत्यंत काळजीपूर्वक होणार आहेत त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी.
संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील, तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागातील अधिकारी यांची पथके करावीत व सर्व परीक्षा केंद्राना भेटी द्याव्यात,जिल्ह्यात कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा,रिपोर्ट करा,तात्काळ कृती करा, वैयक्तिक,सामुहिक कॉपी होणार नाही, झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल,कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल,परीक्षा नियंत्रण कक्ष व वॉर प्रत्येक परीक्षा केंद्राचे लाईव्ह नियंत्रण ठेवतील,असे निर्देश देण्यात आले आहे.
यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही आवाहन केले असून सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना आदेशीत केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाटकर यांनी केले.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या परीक्षेबाबत बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय झालेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा